Navratri 2024: नवरात्रीमध्ये नऊ दिवस देवीला दिला जाणारा नैवेद्य अन् त्यामागचे महत्त्व; जाणून घ्या...
नवरात्री अवघ्या काही दिवससांवर येऊन ठेपली आहे अनेक मंडळामध्ये तयारी देखील सुरु झाली आहे. दुर्गेच्या महिमेवर अनेक कथा आपण ऐकूण असाल देवीने नऊ दिवस महिषासुरासोबत युद्ध करून अखेर दहाव्या दिवशी त्याच्या वध केला जो दिवस हिंदू धर्मात दसरा म्हणून ओळखला जातो. नवरात्रीची पुजा ही मोठ्या भक्तीमय आणि भावपूर्ण वातावरणात पार पाडली जाते. नवरात्रीचे नऊ दिवस हे फार उत्साहाचे असतात. नवरात्रीच्या दिवसांमध्ये देवीचा मोठ्या मनोभावे स्त्री आणि पुरुषांकडून उपवास केला जातो. नवरात्रीचा उपवासात स्त्री असो किंवा पुरुष हे काही न खाता पीता निर्जळी उपवास करतात. यादरम्यान देवीला नऊ दिवस वेगवेगळा नैवेद्य दाखवला जातो हा नैवेद्य कोणता आणि त्याचे महत्त्व जाणून घ्या.
नवारात्रीच्या पहिल्याच दिवशी शैलपुत्रीची पुजा केली जाते. शैलपुत्रीला गायीच्या तुपाचा नैवेद्य दाखवला जातो तसेच गायीच्या दुधापासून तयार होणारे पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवले जातात. तुप हे आपल्या शरीरासाठी खुप फायदेशीर असते. तुप खाल्याने हाडे मजबूत होतात तसेच शरीरातील रोगप्रतीकार शक्ती वाढते.
नवारात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते. ब्रह्मचारिणीला साखर नैवेद्य म्हणून दाखवली जाते. साखर शुभ मानली जाते कोणत्या ही चांगल्या कार्यासाठी ते कार्य चांगल्यापणे पार पडावे यासाठी साखर दिली जाते.
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटाची पूजा केली जाते. चंद्रघंटाला देखील दुधापासून बनवलेला पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवला जातो. दूध हे देखील आपल्या शरीरासाठी चांगले असते त्याच्यामुळे मन शांत होते आणि आपले आपल्या कार्यात लक्ष राहते.
नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कूष्मांडाची पूजा केली जाते. कूष्मांडेला मालपोह्यांचा नैवेद्य दाखवला जातो. मालपोहा हे उत्तर भारतातील पारंपरिक पदार्थ आहे जो गहू, गुळ, साखर, इलायची आणि मीठ तसेच दूध, नारळ, दही यांच्यापासून बनवला जातो.
नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते. स्कंदमातेला केळीचा नैवेद्य दाखवला जातो. केळी खाल्याने आपण निरोगी आयुष्य जगू शकतो तसेच केळी आरोग्यासाठी फार गुणकारी ठरतात.
नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कात्यायनीची पूजा केली जाते. कात्यायनीला मधाचा नैवेद्य दाखवला जातो. मधाचे सेवन केल्याने घसा शांत होतो आणि खोकला थांबण्यास मदत होते.
नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्रीची पूजा केली जाते. कालरात्रीला गुळाचा नैवेद्य दाखवला जातो. गुळ पचनास करते तसेच हाडे मजबूत होण्यास मदत करते आणि लठ्ठपणा कमी करते तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढते.
नवरात्रीच्या आठव्या दिवशी महागैरीची पूजा केली जाते. महागौरीला नारळाचा नैवेद्य दाखवला जातो. रक्तातील साखरेचे नियंत्रण वाढविण्यात मदत करू शकते रोगप्रतिकार प्रणाली आणि निरोगी त्वचा राहण्यास मदत करते.
नवरात्रीच्या नवव्या दिवशी सिद्धिदात्रीची पूजा केली जाते. सिद्धिदात्रीला चणे-हलव्याचा तसेच रव्याची खीर, पुरी आणि काळ्या हरभऱ्याचा नैवेद्य दाखवला जातो.